देशातील कोरोनाबाधीतांची संख्या 21 हजार 393

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता सध्या चिंतेचं वातावरण आहे. गेल्या २४ तासात ही संख्या वाढून आता २१ हजार ३९३ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींची संख्या ६८१ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बाधीत रुग्णांपैकी ४ हजार २५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या देशभरात कोरोनाच्या एक्टिव रुग्णांची संख्या १६ हजार ४५४ आहे. देशात कोरोनेच सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे ५ हजार ६४९ रुग्ण आहेत. तर २६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिल्ली आणि गुजरातमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये २ हजार २७२ तर दिल्लीत २ हजार १५६ रुग्ण आहेत. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी १५ हजार कोटींच्या आरोग्य पॅकेजची घोषणा केली. यातील साडे सात हजार कोटी रुपये हे लगेच आरोग्यविषयक उपोययोजनांवर खर्च केले जाणार आहेत. तर उर्वरित निधी १ ते ४ वर्षांच्या उपाययोजांनवर खर्च केला जाणार आहे.