Home > News Update > सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, काय घडलं आतापर्यंत?

सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, काय घडलं आतापर्यंत?

सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, काय घडलं आतापर्यंत?
X

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला एका स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात शनिवारी तपास अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे. आज त्यांना एनआयएने न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे गुन्हा?

सचिन वाझे यांच्याविरोधात कलम 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.

या गोंधळामुळे काल 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.

त्यानंतर एनआयए ने चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली आहे.

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहेत. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे मुख्य आहेत. जून २०२० मध्ये वाझे यांचे निलंबन मागे घेण्यात येऊन त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले होते. १९९०च्या दशकात वाझे यांची ठाण्यात बदली झाली. तेव्हा मुंबईत माफियांचा धुमाकूळ सुरू होता. वाझे यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केले. सचिन वाझे यांनी आतापर्यंत अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. पण २००२मध्ये मुंबईतील एका बॉस्बस्फोटाची चौकशी करत असताना ख्वाजा युनूस याला ताब्यात घेण्यात आले होते. पण या ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा आरोप झाला आणि काही अधिकाऱ्यांवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला त्यात सचिन वाझे हे सुद्धा होते. त्यानंतर याच प्रकरणा त्यांनी २००४मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाल्यावर सचिन वाझे यांचे निलंबन रद्द झाले आणि त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीमचे नेतृत्व वाझे यांनीच केले. तर अर्णब गोस्वामींना अडचणीत आणणाऱ्या टीआरपी घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.

Updated : 16 March 2021 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top