Home > News Update > 2 महिने लग्नासाठी वाट पाहिली, शेवटी निवडला ‘हा’ भन्नाट पर्याय

2 महिने लग्नासाठी वाट पाहिली, शेवटी निवडला ‘हा’ भन्नाट पर्याय

2 महिने लग्नासाठी वाट पाहिली, शेवटी निवडला ‘हा’ भन्नाट पर्याय
X

कोरोना मुळे काही वाईट परिणाम झाले आहेत. तसं काही चांगले परिणाम देखील झाले आहेत. विशेष सांगायचे झाले तर घरगुती सोहळे. मग ते लग्न असो की, घराची वास्तुशांती असो या सगळ्या कार्यक्रमांना सरकारने व्यक्तींची मर्यादा घालून दिल्यानं मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होत आहे.

त्यात लग्नात तर मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. लग्न म्हटले की, मेहंदी, बॅचलर पार्टी, हळद, बँड बाजा, नंतर निघणारी वरात, घरावर केली जाणारी रोषणाई यावर आपण मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो.

मात्र, कोरोना महामारीने या सर्वांवर वचक आणला आहे. यामुळे लोकांचे दोन पैसेही वाचत आहेत. याच पैशाचा पुढे नवविवाहीत दाम्पत्यांना फायदा देखील होत आहे. असाच एक विवाह बदलापूर येथील सत्कर्म बालकाश्रमात संपन्न झाला. अवघ्या 40 नातेवाईकांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहसोहळ्याची रंगतच न्यारी आहे.

मुलाला मुलगी पसंत झाली. आता लग्नाची तारीखही ठरली. मात्र, जगात कोरोनानं थैमान घातल्यानं लग्नाची तारीख पुढं ढकलली. मात्र, कोर्टाच्या तारीख पे तारीख प्रमाणे लॉकडाऊन वाढत गेला. शेवटी 2 महिने वाट पाहिल्यानंतर स्वप्नील देवकर आणि प्राची शिर्के यांनी अतिशय साध्या पद्धतीने विवाह उरकून घेण्याचे ठरवले. आणि लग्नासाठी जो खर्च लागणार होता. तो 10 सेवाभावी संघटनाना देण्याचे ठरवले, त्यानुसार आज अतिशय साधे पद्धतीने हा विवाह पार पडला आणि सामाजिक संस्थांना मदत देखील देण्यात आली.

Updated : 17 Jun 2020 9:08 PM IST
Next Story
Share it
Top