Sex करताना दोघं मेले,‘न्यूज १८ लोकमत’ला लोकांनी झापलं...
Max Maharashtra | 1 Oct 2019 4:42 PM IST
X
X
‘न्यूज १८ लोकमत’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीवरुन नेटकऱ्यांनी चॅनेलला चांगलंच झोडपलं आहे. ‘सेक्स करताना बाल्कनीतून खाली पडलं कपल, दोघांचाही जागीच मृत्यू’ या मथळ्याखाली ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
या बातमीवर लोकांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. नॉर्थ अमेरिकेत इक्वाडोर करापुंगो या जिल्ह्यातील एका घटनेवर ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीने ३० सप्टेंबरला ही बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी मोठ्या प्रमाणात वायरल देखील झाली. मात्र नेटकऱ्यांनी या बातमीवर ‘न्यूज १८ लोकमत’ला चांगलंच ट्रोल केलंय.
"लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजली जाणारी पत्रकारिता एवढ्या खालच्या स्थरावर जाऊन बातमी छापतात हे लोकमतने दाखवून दिले" त्याचबरोबर ‘न्युज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला राष्ट्रपती पुरस्कार देण्याचा सल्ला देखील नेटकऱ्यांनी दिला आहे. अशाप्रकारे खिल्ली उडवणाऱ्या शेकडो कमेंट्स या बातमीवर आल्यात.
Updated : 1 Oct 2019 4:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire