Home > News Update > Valentine’s Day : पाकिस्तान ते इराण पर्यंत व्हॅलेंटाईन साजरा न करणारे देश

Valentine’s Day : पाकिस्तान ते इराण पर्यंत व्हॅलेंटाईन साजरा न करणारे देश

१४ फेब्रुवारी ला देशभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा होतोय. मात्र, काही देश आजही हा दिवस साजरा करत नाहीत. कारण अशा दिवसाला काही देशात धार्मिक मान्यताच नाहीये.

Valentine’s Day : पाकिस्तान ते इराण पर्यंत व्हॅलेंटाईन साजरा न करणारे देश
X

जगात मुस्लिम लोकसंख्या असलेलं पाकिस्तान (Pakistan) दुस-या क्रमांकाचा देश आहे. पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करण्याविषयी संमिश्र भावना आहेत. युवावर्गात व्हॅलेंटाईन डे ची लोकप्रियता वाढत असतांना त्याविरोधात पाकिस्तानमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर दंगली झालेल्या आहेत.

उजबेकिस्तान (Uzbekistan) त्यांच्या इतिहास आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे प्रसिद्ध आहे. तिथे इस्लाम प्रमुख धर्म आहे. एक मीडिया रिपोर्टनुसार उजबेकिस्तानमध्ये २०१२ पर्यंत व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात होता. मात्र, त्यानंतर हा दिवस साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले. तर दुसरीकडे उजबेकिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने हा दिवस बाबर जन्मदिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

इस्लामिक धर्मगुरूंनी बनवलेला देश म्हणून इराणची (Iran) ओळख आहे. या देशात सरकारने व्हॅलेंटाईन डे शी निगडीत गिफ्टच्या उत्पादनावर निर्बंध लावलेले आहेत. याशिवाय व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावरही निर्बंध टाकलेले आहेत. कारण इराण सरकारला वाटतं की, हा दिवस साजरा करणं म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करणं होय. व्हॅलेंटाईन डे ला पर्याय म्हणून इराणमध्ये मेहरगान (Mehergan) साजरा केला जातो. मेहरगान हा इराणमधील प्राचीन सण आहे. जो इराणमध्ये इस्लाम धर्माच्या आधीपासूनच साजरा केला जात आहे. हा सण याजता मेहर म्हणजेच मैत्री, प्रेम, स्नेहाच प्रतिक समजला जातो.

दक्षिण-पश्चिम आशिया (South-West Asia) खंडातील सऊदी अरब (Saudi Arabia) हे आणखी एक मुस्लिम राष्ट्र आहे. सऊदीमध्ये सुरूवातीपासूनच प्रेम हे सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यावर मनाई आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करणं सऊदी अरब देशाच्या विचारधारेच्या विरोधात आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन समुदाय राहतो. खरंतर विदेशी नागरिकांना या देशात येऊन काम करायला परवानगी आहे. या विदेशी नागरिकांना त्यांच्या धार्मिक विधी करायला परवानगी नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे शी संबंधित कुठलीही वस्तू उदाहरणार्थ गुलाब, टेडी बियर अशा वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

मलेशियामध्ये (Malaysia) २००५ नंतर इस्लामी अधिका-यांनी एक फतवा जारी केला होता. यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर निर्बंध लावले होते. या दिवसाला मलेशियामध्ये युवा वर्गासाठी आपत्ती आणि नैतिक अधःपतनाचं कारण मानलं जातं. दरवर्षी मलेशियामध्ये एंटी-डे व्हॅलेंटाईन अभियानाचंही आयोजन केलं जातं. बाहेर जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करणा-या लोकांना अटकेची भीती असते.

इंडोनेशियामध्ये (Indonesia) प्रत्यक्षात व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याबाबत कुठलाही कायदा नाही. मात्र, या देशातील सुरबाया, मकासर इथं कट्टर मुस्लिम समुदायाची संख्या अधिक आहे. त्यामुळं इथं व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही. तर बंदो आचे सारख्या भागात व्हॅलेंटाईन डे वर पूर्णपणे निर्बंध आहेत.

Updated : 14 Feb 2023 3:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top