Home > News Update > कोरोना काळात भ्रष्टाचार वाढला, सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

कोरोना काळात भ्रष्टाचार वाढला, सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

कोरोना काळात भ्रष्टाचार वाढला, सुधागडचा दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात
X

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर आणि इतर तिघांना 20 हजारांची लाच घेतांना शुक्रवारी (ता.16) लाचलुचपत विभाग अलिबाग यांनी सापळा रचून पकडले आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांना त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या पाली येथील नवीन फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जितेंद्र पुरुषोत्तम वाईकर याने स्वतःसाठी, महम्मद गुलाम रब्बानी इंद्रिस आशी शेख व राजेश सरदारमल राठोड यांने वाईकर यांच्यासाठी तक्रारदारांकडे शुक्रवारी (ता.16) 24 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडी अंती 20 हजार रक्कम ठरली. ही लाचेची रक्कम राजेश राठोड याने शुक्रवारी (दि.16) रोजी स्वीकारली आहे. या तिघांसह दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी कर्मचारी हरेश संजय ठाकूर याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड यांच्याकडून करण्यात आले आहे.

 पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रबंध विभाग ठाणे परिक्षेत्र. पंजाबराव ऊगले, अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रबंध विभाग ठाणे परिक्षेत्र मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा पोलीस उपअधीक्षक, अलिबाग रायगड सुषमा सोनवणे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार विश्वास गंभीर, दीपक मोरे, महेश पाटील व विशाल शिर्के यांनी रचला होता.

Updated : 16 April 2021 3:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top