Home > News Update > CoronaVirus : कोरोनाने वाढवलं राज्याचं टेन्शन, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक

CoronaVirus : कोरोनाने वाढवलं राज्याचं टेन्शन, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे. त्यातच गेल्या 24 तासात राज्यात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus : कोरोनाने वाढवलं राज्याचं टेन्शन, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक
X

राज्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या 24 तासात राज्यात 803 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच 3 रुग्णांचं कोरोनामुळे निधन (Corona death case) झाले आहे. त्यामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे.

सध्या राज्यात 4 हजार कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्याबरोबरच राज्यात कोरोनामुक्त (Corona Recovery Rate) होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. दुसरीकडे देशात 5 हजार 335 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ 23 सप्टेंबर 2022 नंतरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. गेल्या आठ महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, हात सॅनिटायझरने धुवा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन केले जात आहे.

याबरोबरच कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज होणार आहे.

Updated : 7 April 2023 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top