चीनपेक्षा भारतातून येणारा कोरोना घातक, ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचा अजब दावा

covid -19 world pandemic

‘भारतातून येणारं कोरोना व्हायरसचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा अधिक घातक आहे. देशात कोविड-१९ च्या वाढत्या आकड्याला भारतात अवैध पद्धतीने येणाऱ्या नागरिक जबाबदार आहे.’

असा दावा नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी केला आहे. ते नेपाळ च्या संसदेत बोलत होते.

‘बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे नेपाळमधील कोरोनाचं संक्रमण रोखणं हे कठीण झालं आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक रूग्णांनी नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. हा व्हायरस बाहेरुन आला आहे. आमच्या इथे तो नव्हता. सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीला आम्ही रोखू शकलो नाही. भारतात येणारा कोरोना व्हायरस हा चीन आणि इटलीपेक्षा देखील घातक आहे.”

भारतात नेपाळमधून कित्येक अवैध मार्गाने प्रवेश करतात. त्यातच भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये लिपुलेख दरीतून उत्तराखंडच्या धारचुलाला जोडण्यासाठी एक रस्ता बांधल्यानं वाद निर्माण झाला आहे.