Home > News Update > औरंगाबादेत धोक्याची घंटा | कोरोनाचा तिसरा मृत्यू; बधितांची संख्या २९ वर

औरंगाबादेत धोक्याची घंटा | कोरोनाचा तिसरा मृत्यू; बधितांची संख्या २९ वर

औरंगाबादेत धोक्याची घंटा | कोरोनाचा तिसरा मृत्यू; बधितांची संख्या २९ वर
X

औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 65 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. शहरातील बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या या वृद्धेवर याआधी दोन खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आलं होतं. शहरातील कोरोनाचा हा तिसरा मृत्यू आहे. हे तीनही मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत.

दरम्यान, बायजीपुयातील १५ वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. हा मुलगा १० एप्रिलला गरोदर आईला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून औरंगाबादला आला होता. त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यातआईचा आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Updated : 18 April 2020 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top