Home > News Update > Corona Update : चिंताजनक! 24 तासात रुग्णसंख्या अडीच लाखांपार

Corona Update : चिंताजनक! 24 तासात रुग्णसंख्या अडीच लाखांपार

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातच गेल्या 24 तासात देशात 2 लाख 64 हजार 202 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Big Spike of Covid case in india)

Corona Update : चिंताजनक! 24 तासात रुग्णसंख्या अडीच लाखांपार
X

ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) च्या पार्श्वभुमीवर देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 64 हजार 202 इतक्या रुग्णांची वाढ झाली. तर गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 16 हजार 785 रुग्णांची वाढ झाली. ही रुग्णवाढ गुरूवारच्या तुलनेत 6.7 टक्के इतकी जास्त आहे. तर 20 मे 2021 नंतर प्रथमच दररोजच्या रुग्णसंख्येने अडीच लाखांचा टप्पा पार केला आहे. तर 24 तासात 315 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 24 तासात देशात 1 लाख 9 हजार 345 रुग्ण (Corona Recovery case) उपचारानंतर बरे झाले आहेत. यासह देशातील कोरोनामुक्तीचा दर 98.63 टक्क्यांवर पोहचला आहे. तर देशात 12 लाख 72 हजार 73 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच देशाचा दररोजचा कोरोना रुग्णवाढीचा दर 14.78 टक्क्यांवर पोहचला आहे.

देशात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. तर आतापर्यंत देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5 हजार 753 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 1 हजार 367 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 775 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये बोलताना देशात सध्या लॉकडाऊनची कुठलीही शक्यता नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Updated : 14 Jan 2022 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top