Home > News Update > Corona Update : देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण, मात्र मृत्यूसंख्या वाढली

Corona Update : देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण, मात्र मृत्यूसंख्या वाढली

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. तर साडेतीन लाखांच्या घरात गेलेली रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे.

Corona Update : देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण, मात्र मृत्यूसंख्या वाढली
X

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 27 हजार 952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होऊन 1 हजार 59 इतकी झाली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या साडेतीन लाखांच्या घरात पोहचली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घसरण होत असून गेल्या 24 तासात 1 लाख 27 हजार 952 रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशात 1 हजार 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 2 लाख 30 हजार 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 4 कोटी 2 लाख 47 हजार 902 इतकी झाली आहे. तर सध्या 13 लाख 31 हजार 648 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासह आतापर्यंत एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 1 जार 114 पोहचली आहे. तर सध्या देशाचा रुग्णवाढीच्या दरात मोठी घसरण होऊन 7.98 टक्के इतकी झाली आहे. देशातील नागरीकांना 168 कोटी 98 लाख 17 हजार 199 लसींचे डोस देण्यात आले आहेत.

राजेश टोपे यांनी महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट संपेल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होत असला तरी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Updated : 5 Feb 2022 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top