Home > News Update > Covid 19 : कोरोनाचा धोका वाढला, सातारा पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही प्रशासनाने मास्क वापरण्याचे केले आवाहन

Covid 19 : कोरोनाचा धोका वाढला, सातारा पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही प्रशासनाने मास्क वापरण्याचे केले आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर प्रशासनानेही नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

Covid 19 :  कोरोनाचा धोका वाढला, सातारा पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही प्रशासनाने मास्क वापरण्याचे केले आवाहन
X

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. त्यापार्श्वभुमीवर सातारा (Satara) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) प्रशासन सतर्क झाले आहे.

गेल्या आठवड्यात साताऱ्यात जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोणाचे रुग्ण (Covid 19 case) आढळून येत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क (Use mask) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यासाठी पूर्वतयारी म्हणून व अचानक कोरोनाचा फैलाव झाल्यास काय उपाययोजना करता यावी, म्हणून प्रशासनाने मॉकड्रील केली होती. त्याचा अहवाल सरकारला देखील पाठवला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण 62 सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहेत. सध्या मास्क सक्ती नसली तरी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमाचे (Covid Guidline) पालन करावे. घराबाहेर निघताना न चुकता मास्क घालावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras mandlecha) यांनी केले आहे.



Updated : 6 April 2023 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top