Home > News Update > जानेवारीच्या मध्यावर राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता, आरोग्य विभागाचा इशारा

जानेवारीच्या मध्यावर राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता, आरोग्य विभागाचा इशारा

जानेवारीच्या मध्यावर राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता, आरोग्य विभागाचा इशारा
X

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. सोबतच आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊलं उचलावी लागणार आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत घेण्याचे त्यांनी निर्देश त्यांनी दिले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिलेत. यावेळी बोलताना डॉ. व्यास यांनी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते . मात्र, आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्क्यांनी वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही ते म्हणाले.

Updated : 27 Dec 2021 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top