Home > News Update > मुंबईतील ‘या’ १० खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड

मुंबईतील ‘या’ १० खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड

मुंबईतील ‘या’ १० खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड
X

राज्यात आणि मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात सद्य स्थितीला ४२ तर, मुंबईत ७ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकने दहा खासगी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या काही दिवसात या रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी वॉर्ड सुरू होणार आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. दक्षा शहा म्हणाल्या, “सद्य स्थितीला कस्तुरबा रुग्णालयात ७४ संशयित दाखल आहेत. मधुमेहाने ग्रस्त एका रुग्णाची तब्येत गंभीर आहे. खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी राखीव खाटांबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसातच यापैकी काही ठिकाणी वॉर्ड सुरू होतील.”

खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण खाटांची सुविधा

जसलोक रुग्णालय - ५

हिंदुजा रुग्णालय - २०

एच.एन.हिरानंदानी - २

कोकिलाबेन रुग्णालय - १७

रहेजा रुग्णालय - १२

जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे रुग्णालय - १०

गुरूनानक रुग्णालय - २

सेंन्ट एलिझाबेथ रुग्णालय - २

बॉम्बे रुग्णालय - २

लिलावती रुग्णालय - १५

दक्ष शहा पुढे म्हणाल्या, “मुंबईतील खासगी लॅबसोबत बोलणी सुरू आहेत. यासाठी सरकारची परवानगी लागेल. ही परवानगी मिळाल्यानंतर खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी सुरू होईल. खासगी लॅबमध्ये तपासणी झाल्यास पैसे आकारायचे की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.”

सौजन्य: माय मेडिकल मंत्रा

Updated : 18 March 2020 4:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top