Home > News Update > महाराष्ट्रात Lockdown होणार का?, आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात Lockdown होणार का?, आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात एका दिवसात कोरोनाचे 1485 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन वर्षापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

महाराष्ट्रात Lockdown होणार का?, आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
X

जालना // महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात एका दिवसात कोरोनाचे 1485 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन वर्षापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रालाच बसला त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच आता राज्यात लॉकडाऊनची चर्चाही जोर धरू लागली आहे. याबाबत बोलताना शनिवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी लागू होणार आहे.वैद्यकीय ऑक्सिजनची दररोजची मागणी 800 मेट्रिक टनपर्यंत असेल तेव्हाच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

ओमायक्रॉन जगभरातील देशांसाठी अडचणीचा ठरला आहे. ओमायक्रॉनचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसू लागला. गेल्या एका दिवसात राज्यात 20 ओमायक्रॉन रुग्ण आढळलेत. त्यातच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोकांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले आहे.

राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता शाळा पुन्हा बंद होणार का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबाबत बोलताना

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, शाळा नियमित सुरू राहतील मात्र निर्बंध कटाक्षाने पाळावे. आज ओमायक्रॉनचा आकडा शंभरीत असताना डबल ने वाढतोय, जर हजारावर आकडा जाऊन दुपटीने अशीच वाढ झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल.

Updated : 26 Dec 2021 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top