Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना रोजगाराच्या मुळावर

कोरोना रोजगाराच्या मुळावर

जागतिक महामारी कोणामुळे अवघ्या मानव जात संकटात सापडली. असे कुठलेही क्षेत्र नाही त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही. रोजगार हे महत्त्वाचे क्षेत्र कसे कोरोनामुळे बदल झाले त्यावर विश्लेषणात्मक मतं मांडली आहेत अभ्यासक विकास मेश्राम यांनी..

कोरोना रोजगाराच्या मुळावर
X

कोरोना संकटाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून जगातील बहुतेक लोकांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रातील रोजगाराचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. नोकरी करणार्‍या लोकांपासून दैनंदिन हातावर पोट असणार्‍या लोकांची रोजगारांची परिस्थिती डगमगली आहे. या कोरोना साथीने अनेक बड्या व छोट्या उद्योजकांची कंबरडे मोडली आहे. देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगही या संकटात सापडले आहेत.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमईसी) च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आर्थिक वर्ष 2019 - 20 च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्चपर्यंत नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या 55 लाखांपेक्षा जास्त आहे. पगारदार नोकरी करणार्‍या लोक , ज्यांची नोकरी गेली आहे, ते एक कोटींपेक्षा जास्त आहेत. ही संख्या दररोज वाढत आहे. अहवालानुसार रोजगार गमावलेल्यांपैकी 60 टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत. त्यापैकी बहुतेक कंपन्या एमएसएमई क्षेत्राशी संबंधित असुन म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी निगडित आहेत


सीएमईसीच्या आकडेवारीनुसार 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात देशात बेरोजगारीचा दर 6.9 टक्के होता. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावरही झाला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बेरोजगारीचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. 11 मार्च 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर 7 टक्के होता, जो आता 8.6 टक्क्यांवर गेला आहे. बेरोजगारीच्या दरामध्ये सध्या होणारी घसरण हे दर्शविते की देशात पुन्हा रोजगाराच्या संधी जलद गतीने कमी होत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) मध्ये 29 टक्के वाटा आहे . आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील मंदीचे मुख्य कारण कोरोना साथीचा आजार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. आकडेवारी दर्शविते की मागील 4 महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी 2021 मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर वाढून 7.78 टक्के झाला, जो ऑक्टोबर 2019 नंतरचा उच्चांक आहे. जानेवारी 2021 मध्ये हा दर 7.16 टक्के होता. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे दर फेब्रुवारी 2021 मध्ये 7.37% पर्यंत वाढले आहेत, जानेवारीत ते 5.97% होते. शहरी भागात हा दर 9.70 टक्क्यांवरून घसरून 8.65 टक्क्यांवर आला आहे.

सेवा व उत्पादन क्षेत्रातील छोट्या कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वेक्षणात म्हटले आहे की कोरोना साथीच्या आजारामुळे गेल्या एका वर्षात भारत सर्वात जास्त कोरोना बाधित देश म्हणून उदयास आला आहे. आता दुसर्‍या लाटेच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे विविध राज्यात बंद आणि कडक निर्बंध यासारख्या उपायांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. घटत्या उत्पन्नामुळे उत्पादनांची मागणीही नाहीशी झाली आहे. सर्वेक्षण केलेल्या 70 टक्के कंपन्यांनी म्हटले आहे की कोविड -19 पुर्वीची स्थिति येण्यासाठी आणि मागणीच्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांना सुमारे 18 महिने लागतील. त्याचप्रमाणे 22 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने असे म्हटले होते की चालू आर्थिक वर्ष 2021-22 मधील कोरोनाची दुसरी लाट भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीच्या मार्गात एक मोठी अडथळा ठरली आहे.

दुसऱ्या बाजूचा विचार केला तर भारतीय कामगारांचा जास्तीत जास्त कामकाजाचा कालावधी 7 ते 8 तास असतो. वर्क फ्रेम होममध्ये, कामासाठी कोणतीही निर्धारित वेळ मर्यादा नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे 79.8 %लोक अशी तक्रार करतात की त्यांना विशेष परिस्थितीत 17 ते 18 तास अधिक काळ काम करावे लागेल. 63% लोक असे म्हणतात की ते वर्क फ्रॉम होम नावाखाली ओलिस बनले आहेत. कामगारांच्या कामाच्या कालावधीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक वेळा आवाज उठविण्यात आले आहेत. बर्‍यांच देशांनी आधीच आपल्या कामगारांना विशिष्ट कालावधीतच कामाचा अधिकार दिला आहे. भारतासारख्या देशात या दिशेने त्वरित पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

विकास परसराम मेश्राम, गोदिंया

[email protected]

Updated : 2021-05-17T12:07:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top