Home > News Update > कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी...

कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी...

कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी...
X

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात आज तिसऱ्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमध्ये शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आहे.

कृषीपुरवठा साखळीसाठी अतिरीक्त 500 कोटी

मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपयेभाजीपाला पुरवठ्यासाठी 'ऑपरेशन ग्रीन', भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान

मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल

वनौषधींसाठी 4 हजार कोटी

फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी

मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी

पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी

दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी

कोरोना व्हायरस च्य़ा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्या पॅकेजच्या 3 ऱ्या टप्प्यातील पॅकेज ची घोषणा केली.

Updated : 15 May 2020 11:56 AM GMT
Next Story
Share it
Top