Home > हेल्थ > कोरोना मुळे नागरिकांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम...

कोरोना मुळे नागरिकांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम...

प्रत्येक संसर्गजन्य आजारात चव न लागने आणि वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोच पण आपल्या दैनंदिन जीवनात तो बदल मोठ्या प्रमाणावर जाणवत नाही.

X

प्रत्येक संसर्गजन्य आजारात चव न लागने आणि वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोच पण आपल्या दैनंदिन जीवनात तो बदल मोठ्या प्रमाणावर जाणवत नाही. मात्र कोरोना झाल्यास वास घेण्याची क्षमता जाणं (Loss of Smell) हे लक्षण अनेकांना अजून पर्यंत जाणवत आहे. मुळात कोरोना होऊन गेल्या नंतर त्याची लक्षणे दिसत नाही पण वास घेण्याची क्षमता यायला बराच वेळ लागतो. कोरोना मुळे नागरिकांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम...



डॉ निक्सन अब्राहाम जे पुण्यातील विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संशोधक आहेत. यांनी या संबंधातील रिसर्च 'करंट रिसर्च इन युरोबायोलॉजि" या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित केले. कोरोनातून अनेक रुग्ण बरे झाले, पण अनेकांना वास घेण्याची क्षमता गमावली आहे. काही तज्ज्ञ ही क्षमता परत मिळवण्यासाठी स्ट्राइडचा सल्ला देतात. पण ही क्षमता परत मिळवण्याचा हा पहिला मार्ग नव्हे असं म्हणत संशोधकांनी आता सोपा उपाय सांगितला आहे.


तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. ऑलफॅक्ट्री नर्व्ह नाकात वास ओळखण्याची नर्व्ह असते. कोरोनाव्हायरस या नर्व्ह सिस्टिमला डॅमेज करतो किंवा इजा पोहोचवतो. त्यामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते किंवा नाहीशी होते.


तज्ज्ञांच्या मते वारंवार सुगंध घेत राहावा. जसे कि फुलांचा सुगंध, जेवणाचा इत्यादी, दिवसातून दोन ते चार वेळा वगवेगळ्या प्रकारचा सुगंध घेतल्यास परिणामी वास येण्याच्या क्षमता लवकर परत येऊ शकते.

मुळात वास न येणे हि बाब मेंदूशी संबधीत आहे. मेंदूमुळे वासाची जाणीव होते. कोरोना संसर्गानंतर रुग्णांच्या निराळं सर्किट वर अनेक परिणाम दिसून आले. कोरोना नंतर अनेक रुग्णांची वास येण्याची क्षमता परत आली आहे, पण असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कोणत्याच प्रकारचा वास ओळखता येत नाहीये.

कोरोनामुळे वास घेण्याची क्षमता कायमस्वरूपी जात नाही. नाकाला सुगंध घेऊन वासाची सवय लावण्याचा पर्याय हा योग्य पर्याय असल्याचं म्हटलं गेलं आहे. माहिती कशी वाटली कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.

Updated : 8 April 2023 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top