Home > News Update > संविधान सन्मान दौड, उद्देशिकेचे सामूहिक वाचन

संविधान सन्मान दौड, उद्देशिकेचे सामूहिक वाचन

संविधान सन्मान दौड, उद्देशिकेचे सामूहिक वाचन
X

पुणे संविधान दिन साजरा करण्यापेक्षा संविधाना बद्दल जागरूकता निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. डॉ आंबेडकरांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत. भारताची लोकशाही सुद्रूड करण्याचे काम त्यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असं संविधान लिहिलं आहे जे हजारो वर्ष बदलावेच लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, असं व्यवस्तीत विवेचन यामध्ये आहे. नव्याने तयार झालेल्या अनेक देशांनी या संविधानाकडे पाहून आपले संविधान तयार केले. असे मत उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.

भारतीय संविधान दिनानिमित्त "संविधान सन्मान दौड 2023" चे आयोजन पुणे विद्यापीठात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले. याठिकाणी मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 31 देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे ,सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशनयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. ही स्पर्धा तीन गटात झाली दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर यांनी केले या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे , विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे ,पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार , राहुल डंबाळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Updated : 27 Nov 2023 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top