Home > News Update > काँग्रेस कार्यकर्त्याचा अनोखा उपक्रम; गणेश मूर्ती केवळ पाच रुपयात

काँग्रेस कार्यकर्त्याचा अनोखा उपक्रम; गणेश मूर्ती केवळ पाच रुपयात

काँग्रेस कार्यकर्त्याचा अनोखा उपक्रम;  गणेश मूर्ती केवळ पाच रुपयात
X

काँग्रेस कार्यकर्ता भरत सुराणा यांनी आपल्या प्रभागात एक अनोखा उपक्रम राबवला आहे, गणेशोत्सव हा उद्यावर येऊन ठेपला आहे. अशातच कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी फक्त 5 रुपयांमध्ये गणेश मूर्ती सुराणा यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. तब्बल 555 गणेश मूर्ती त्यांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, या मूर्ती सोबत ते गणेश भक्तांसाठी सॅनिटायझर,मास्क, गणेश आरती संग्रह आणि घरीच गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी पावडर देखील देणार आहेत.

गेल्यावर्षी त्यांनी 111 गणेश मूर्ती 11 रुपये प्रति मूर्ती प्रमाणे दिल्या होत्या. यंदा त्यांनी 5 रुपये प्रति मूर्ती प्रमाणे 555 गणेश मूर्ती देण्याचा ठरवले आहे त्यातील निम्म्याहून अधिक गणेश मूर्ती नागरिकांनी खरेदी केल्या आहेत, तर उद्या सर्वच मूर्ती नागरीक घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी असा उपक्रम राबणार असल्याचे यावेळी सुराणा यांनी सांगितले, त्यांच्या प्रभागातील गरीब - गरजू गणेश भक्तांनाही आपल्या लाडक्या बाप्पाचे जोरदार स्वागत करता यावे, त्यांनी स्थापना करता यावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून छोटासा हातभार म्हणून हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जन जागृती देखील केली जात असल्याने सुराणा यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Updated : 9 Sep 2021 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top