Home > News Update > "काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन"- हरिश रावत

"काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन"- हरिश रावत

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने चर्चेत आले आहेत, आपण काँग्रेस पक्षाची बालिका वधू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन- हरिश रावत
X

नवी दिल्ली // उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने चर्चेत आले आहेत, आपण काँग्रेस पक्षाची बालिका वधू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सांगतो असं रावत म्हणाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आम आदमी पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असं त्यांना विचारला असता ते म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाने मला काही दिलं, नाही दिलं तरी मी माझ्या मनातील गोष्ट परखडपणे सांगतो. माझ्या सुरक्षेसासाठी मला कुठे जाण्याची गरज नाही. जेव्हा कधी मी माझ्या नेतृत्वासमोर उभा राहिलो माझी राजकीय सुरक्षा परत मिळाली. त्यामुळे माझा बालिका वधूचा जो स्टेटस आहे, तो मी का सोडेन? फक्त एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी?" असं वक्तव्य रावत यांनी केलं.

सोबतच "काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन".असंही

हरिश रावत यांनी म्हटले आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सल्ला देताना ते म्हणाले की, उत्तराखंडमधील विविधता समजून घेण्यासाठी पाच ते सात वर्ष तपश्चर्या करावी लागेल.

पुढे बोलताना ते म्हणाले की, "ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथे विरोधकांना सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभागासारख्या मगरींचा सामना करावा लागत आहे. आम्हाला समुद्रात पोहत त्यांच्याशी लढा द्यावा लागत आहे". असं ते म्हणाले.

Updated : 29 Dec 2021 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top