Home > News Update > इंडिया आघाडीत बहुजन समाज पक्षाला सामिल करून घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न

इंडिया आघाडीत बहुजन समाज पक्षाला सामिल करून घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न

इंडिया आघाडीची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस आणखी एका बड्या पक्षाला आघाडीत सामील करण्याच्या प्रयत्नात आहे. तो पक्ष म्हणजे उत्तरप्रदेशात तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवणारा मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आहे.

इंडिया आघाडीत बहुजन समाज पक्षाला सामिल करून घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न
X

इंडिया आघाडीची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस आणखी एका बड्या पक्षाला आघाडीत सामील करण्याच्या प्रयत्नात आहे. तो पक्ष म्हणजे उत्तरप्रदेशात तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवणारा मायावती यांचा बहुजन समाज पक्ष.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसला कमी जागा दिल्या तर काँग्रेस नेते बसपाशी युती करू शकतात.

काँग्रेसचे काही नेते १५ जानेवारीला मायावतींना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी जाण्याची शक्यता दर्शवली जाते. इंडिया आघाडीचे नेते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाला आघाडीत सामील करण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेस नेते मायावतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इंडिया आघाडीत सामील होण्याविषयी चर्चा करू शकतात. मायावतींना सोबत घ्याण्यासाठी कॉंग्रेस सकारात्मक विचार करतांना दिसत आहे. अशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षात वादाची ची परिस्थिति असतांना कॉंग्रेस यामध्ये किती प्रमाणात मध्यस्थी करेन हे पाहण्यायोग्य असेल. माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आता जागावाटपाची चर्चा सुरु आहे. उत्तरप्रदेश या मतदारसंघावर सर्वच पक्षांची नजर लागलेली आहे. जो पक्ष जी आघाडी उत्तरप्रदेशची लोकसभेची निवडनुक जिंकेल तो संसदेत सत्ता स्थापन करेल अशा वर्तवली जाते. अशात उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षात चर्चा सुरु आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसला कमी जागा दिल्या तर काँग्रेस नेते बसपाशी युती करून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी ठेऊ शकतात.

Updated : 12 Jan 2024 3:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top