Home > News Update > 'काँग्रेस पार्टी सोडणार नाही' प्रिया दत्त यांनी दिली मॅक्स महाराष्ट्रला माहिती

'काँग्रेस पार्टी सोडणार नाही' प्रिया दत्त यांनी दिली मॅक्स महाराष्ट्रला माहिती

काँग्रेस पार्टी सोडणार नाही प्रिया दत्त यांनी दिली मॅक्स महाराष्ट्रला माहिती
X

काँग्रेस नेत्या प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहेत. लोकसभा निडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. प्रिया दत्त दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनील दत्त यांची मुलगी आणि अभिनेता संजय दत्त यांची बहीण आहे. २००९ मध्ये उत्तर मध्य मुंबई मतदार संघाच्या खासदार होत्या. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चला प्रिया दत्त यांनी पूर्णविराम दिला आहे. या संदर्भात त्यांनी मॅक्स महाराष्ट्रला प्रतिक्रीया दिली आहे.

काँग्रेस नेत्या प्रिया दत्त म्हणाल्या की "पक्ष बदलाच्या या बातम्या अचानक सुरु झाल्यातं त्याची मलाही माहिती नाही. पण मी काँग्रेस पक्षामध्येच आहे. कोणत्या पक्षात जाण्याचा माझा विचार नाही मी समाज सेवक आहे आणि समाजाची सेवा करत राहणार" असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी बाबासिद्दिकी यांच्या भाषणातील वक्तव्यासंदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या की "सर्वाचे विचार वेगळे आहेत. पक्ष बदलण्याचा माझा कोणताही हेतू नाही. वैयक्तिक कामकाज वाढल्याने राजकारणात सक्रीय होता आलं नाही. काहीही झालं तरी काँग्रेस पार्टी सोडणार नसल्याचं प्रिया दत्त यांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांना फोनवरुन प्रतिक्रीया दिली आहे.

Updated : 19 March 2024 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top