Home > Election 2020 > पुन्हा दांडी यात्रा !

पुन्हा दांडी यात्रा !

पुन्हा दांडी यात्रा !
X

महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लींग चेतवण्याचं काम केलं. गुजरातच्या समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन हातात लाखो अनुयायांच्या साक्षीनं मुठभर मीठ हातात घेतलं. आणि मीठाचा कायदा मोडत सविनय कायदेभंग चळवळीस सुरूवात केली. या घटनेला 12 मार्च ला ऐतिहासिक घटनेला 90 वर्षे पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेसने 12 मार्च 2020 रोजी पुन्हा एकदा दांडीयात्रेचे आयोजन केले आहे. काँग्रेसची दांडी यात्रा ही साबरमती आश्रमातुन (अहमदाबाद) येथे सुरू होणार असुन 6 एप्रिल ला दांडी येथे संपणार आहे.

ही यात्रा गुजरात मधील अहमदाबाद येथून सुरु होऊन 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. 27 दिवस ही यात्रा सुरु राहणार असून या यात्रेत 386 किलोमीटर अंतर कापलं जाणार आहे. विशेष म्हणजे या यात्रेत कॉंग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी पायी या यात्रेत सहभागी होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या सोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.

या यात्रेच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी एका सार्वजनिक सभेला संबोधीत करतील. यामध्ये कॉंग्रेस शासित राज्या चे मुख्यमंत्री, कॉंग्रेस वर्किंग कमिटी चे सदस्य आणि प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या यात्रेतूनच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिल्ली मध्ये अलिकडेच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जनतेला गांधींजीच्या अहिंसेचा संदेश देतील.

Updated : 9 March 2020 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top