Home > News Update > Nana Patole नाना पटोलेंचं Gautam Adani च्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह ?

Nana Patole नाना पटोलेंचं Gautam Adani च्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह ?

Nana Patole नाना पटोलेंचं Gautam Adani च्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह ?
X

 Nana Patole Gautam Adani Narendra Modi

जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीवाढीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (NanaPatole) यांच्या संपत्तीवाढीवर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे.

जगातील मोठ्या अब्जाधिशांच्या (billiniors) संपत्तीत घट झाली असताना एकमेक अदानी यांच्या संपत्तीत वाढ कशी झाली? ही जादू का होतेय हे सर्व भारतीयांनी माहीत आहे असे ट्विट करत नाना पटोले यांनी थेट मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे सतत चर्चेत असतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार अदानीची एकूण संपत्ती आता १४३ अब्ज डॉलर झाली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीही अदानी- अंबानी (Gautan Adani- Mukesh Ambani)यांना वारंवार टार्गेट करत आहेत.

अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकण्याच्या जवळ आले आहेत. बेझोस यांची एकूण संपत्ती १५२ अब्ज डॉलर आहे. म्हणजेच त्यांची एकूण संपत्ती आता अदानीपेक्षा नऊ अब्ज डॉलर्सने पुढे आहे. पण ज्या वेगाने अदानींची संपत्ती वाढत आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत ते बेझोस यांनाही मागे टाकतील.

अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये अलीकडच्या काळात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांपैकी दोन कंपन्यांचे मार्केट कॅप ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत अदानी समूह टाटा समूहानंतर देशातील दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. अदानींचा व्यवसाय खाणी, बंदरे, पॉवर प्लांट्स, विमानतळ, डेटा सेंटर्स, संरक्षण क्षेत्र, मीडिया आणि ग्रीन एनर्जीमध्ये पसरलेला आहे.

१ एप्रिल २०२० पासून ग्रुप कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १७.४४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत समूहाचे शेअर्स ४० पटीने वाढले आहेत. १ एप्रिल २०२० ते २९ ऑगस्ट २०२२ दरम्यान अदानी ट्रान्समिशनचा हिस्सा १९५० टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे अदानी टोटल गॅसचा शेअर ४० पट वाढला. अदानी ग्रीन एनर्जी १४२० टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायझेस २२०० टक्क्यांनी, अदानी पॉवर १,३०० टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्स २३० टक्क्यांनी वाढले.

मध्यंतरी एका दिवसाच्या वाढीतून अदानींची एकूण संपत्ती ५.२९ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ४२,००० कोटी रुपयांनी वाढली होती. एका सर्वेनुसार देशातील ८० कोटी गरिबांना तीन महिने पोट भरण्यासाठी ही रक्कम पुरेशी आहे. कोरोना संसर्गाच्या काळात गरीबांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) एप्रिल २०२० मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेला यावर्षी मार्चमध्ये सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात असून आता त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. ती पुन्हा तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. या योजनेला एक चतुर्थांश मुदतवाढ दिल्यास सरकारला यासाठी ४०,००० कोटी रुपये खर्च करावे लागतील.

देशातील ८० कोटी जनता याचा लाभ घेत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. म्हणजेच अदानीच्या एका दिवसाच्या कमाईतून देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे किमान तीन महिने पोट भरले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा ५ किलो रेशन दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रदान केलेल्या कोट्यापेक्षा हे वेगळे आहे. या कायद्यांतर्गत ग्रामीण भागातील ७५ टक्के आणि शहरी भागातील ५० टक्के लोकांना स्वस्त रेशन दिले जाते.

काल राज्यभर वीज कर्मचाऱ्याचं आंदोलन झालं होतं. मुंबई महानगरातील महावितरण परवाने अदानी कंपनीला देण्यावरुन हे आंदोलन पेटले होते. काल दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadnavis) यांच्यासमवेत बैठकीत खाजगीकरण होणार नाही हे जाहीर केल्यानंतरच वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं होतं.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता थेट गौतम अदानींच्या संपत्तीवरुन मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Updated : 5 Jan 2023 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top