Home > News Update > सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोना

सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोना

सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोना
X

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. या संदर्भात कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांनी घरातच सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करून विलगिकरणात राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जयराम रमेश यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून देखील ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनाही कोरानाची लागण झाली होती. सोनिया गांधी यांना यापूर्वी जून महिन्यातही कोविडची लागण झाली होती. कोरोना झाल्यानंतर सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Updated : 13 Aug 2022 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top