Home > News Update > बीएमसीने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटांची चौकशी करा, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी

बीएमसीने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटांची चौकशी करा, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी

राज्यात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेत मात्र एकमेकांसमोर आले आहेत.

बीएमसीने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटांची चौकशी करा, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी
X

राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत मात्र सत्ताधारी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कोरोनाकाळात दिलेल्या कंत्राटांची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजावादी पार्टीने केली आहे. कोरोना काळात झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करावी, या बैठकीत पालिका आयुक्तांनी उपस्थित राहावे, कोरोनाकाळात केलेल्या कामांची पालिकेच्या लेखापरीक्षक विभागामार्फत चौकशी करावी, आणि यासाठी स्थायी समितीची उपसमिती स्थापन करावी, अशी मागणी करीत समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली आहहे.

या मागणीला विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही पाठिंबा दिला आहे. संयुक्त पत्रक्कार परिषद घेऊन त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाविषयक कामांचे सर्व प्रस्ताव तपशीलवार माहितीसह सादर करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेत अजून महाविकास आघाडी झालेली नाही आहे , त्यामुळे आम्ही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार आणि लोकांचे प्रश्न आम्ही उपस्थित करणार, असेही रवी राजा यांनी सुनावले आहे.

सत्ताधारी शिवसेना भ्रष्टाचाराला खतपाणी सत्ताधारी घालत आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. कोविडच्या काळात पालिकेने आतापर्यंत १३०० कोटी खर्च केले आहेत. अंदाजित खर्चापेक्षा जास्त ४०० कोटींचा खर्च झाला आहे आणि अजून ४५० कोटी रुपये खर्च होणार आहेत असे सांगितले जात आहे. २५१ कोटी रुपये फक्त कोविड सेंटरवर खर्च झाले आहे. ते कंत्राट कुणाला आणि कसे दिले गेले आहेत हे आम्हांला माहिती आहे, सत्ताधाऱ्यांचा पालिकेवर वचक नाही असा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.

हॉटेल ताजच्या समोरचा रस्ता आणि फुटपाथ दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव अतिक्रमण करण्यात आल्याच्या मुद्यावर लोकायुक्तांनी दिलेल्या निर्णयावर पालिकेने रस्त्याबाबत कोणतेही धोरण न ठरवता उलट पालिकेने रस्त्याचे ८.५० कोटी माफ करण्याचे म्हटले आहे. तर फुटपाथच्या १ कोटी ५० लाखांपैकी ५० % रक्कम भरण्याचे प्रस्तावित केले आहे, याचाच अर्थ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ताज हॉटेलला झुकते माप दिल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.

हॉटेल ताजच्या समोरचा रस्ता आणि फुटपाथ दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव अतिक्रमण करण्यात आल्याच्या मुद्यावर लोकायुक्तांनी दिलेल्या निर्णयावर पालिकेने रस्त्याबाबत कोणतेही धोरण न ठरवता उलट पालिकेने रस्त्याचे ८.५० कोटी माफ करण्याचे म्हटले आहे. तर फुटपाथच्या १ कोटी ५० लाखांपैकी ५० % रक्कम भरण्याचे प्रस्तावित केले आहे, याचाच अर्थ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ताज हॉटेलला झुकते माप दिल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. ताजला सूट आणि मुंबईकराकडून मात्र मालमत्ता कर वसूल करणार, ही दुट्टपी भूमिका आहे असा आरोपही त्यंनी केला आहे.

Updated : 30 Dec 2020 3:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top