Home > News Update > खासदार राजीव सातव यांच्या शरिरात सापडला नवा व्हायरस, प्रकृती चिंताजनक

खासदार राजीव सातव यांच्या शरिरात सापडला नवा व्हायरस, प्रकृती चिंताजनक

खासदार राजीव सातव यांच्या शरिरात सापडला नवा व्हायरस, प्रकृती चिंताजनक आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: घेणार भेट

खासदार राजीव सातव यांच्या शरिरात सापडला नवा व्हायरस, प्रकृती चिंताजनक
X

कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, तरीही त्यांना झालेल्या इन्फेक्शनमुळे त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालना येथे माध्यमांशी बोलत होते.

सध्या राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, अद्याप ते व्हेटिंलिटरवर आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते व्हेंटिलिटरशिवाय श्वास घेत होते. मात्र, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

मी त्यांची दवाखान्यात जाऊन भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे आणि मुंबई येथील डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. मराठवाड्याच्या या सुपूत्राला लवकरात लवकर आराम पडो, यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे टोपे म्हणाले.

Updated : 15 May 2021 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top