Home > News Update > काँग्रेस आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल?

काँग्रेस आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल?

काँग्रेस आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल?
X

काँग्रेसचे आमदार शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं समजतंय. जयपूरमध्ये काँग्रेस आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या ४० आमदारांचं एकमत झाल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे राज्यात नवं समीकरण पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आमदारांच्या या बैठकीतल्या तपशीलाबाबत काँग्रेस हायकमांडला माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत.

Updated : 10 Nov 2019 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top