Home > News Update > काँग्रेस नेते शशि थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबतचा सेल्फी वादाच्या भोवऱ्यात ; थरूर यांनी व्यक्त केली दिलगीरी

काँग्रेस नेते शशि थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबतचा सेल्फी वादाच्या भोवऱ्यात ; थरूर यांनी व्यक्त केली दिलगीरी

काँग्रेस नेते शशि थरूर यांचा  6 महिला खासदारांसोबतचा सेल्फी वादाच्या भोवऱ्यात ;  थरूर यांनी व्यक्त केली दिलगीरी
X

नवी दिल्ली // काँग्रेस नेते शशि थरूर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. आता थरूर यांचे एका सेल्फी सोबत केलेलं लिखाण वादात सापडले आहे. या सेल्फीवरुन शशि थरूर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. या टीकेनंतर थरूर यांनीही दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं आहे. थरूर यांनी संसदेतील 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी पोस्ट केला आणि त्यावर कोण म्हणतं की लोकसभा काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं थरूर यांनी ट्विट केलं. थरूर यांच्या याच ओळीवरुन त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

थरूर यांच्या या सेल्फीत काँग्रेसच्या खासदार परनीत कौर आणि जोथिमनी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डीएमकेच्या खासदार थमिजाची थंगापांडियन आहेत.

थरूर यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, महिला तुमच्या कामाच्या ठिकाणाला आकर्षक करण्यासाठी लोकसभा सजवण्याची वस्तू नाही. त्या खासदार आहेत आम्ही तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. तर दुसऱ्या यूजरने ट्विट करत म्हटलं की, तुम्ही जर अन्य सेक्टरमध्ये असता तर आकर्षक म्हणल्यामुळे तुम्हाला काढून टाकलं गेलं असतं.

दरम्यान सोशल मीडियातून होत असलेल्या टीकेनंतर थरुर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'सेल्फीची सगळी गोष्ट (महिला खासदारांच्या पुढाकाराने) मोठ्या विनोदात करण्यात आली होती. त्यांनीच मला सांगितलं होतं की त्याच भावनेने ती पोस्ट करा. पण मी क्षमस्व आहे की काही लोक नाराज झाले आहेत. असं स्पष्टीकरण थरूर यांनी दिलं आहे.

Updated : 2021-11-29T17:06:58+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top