Home > News Update > "प्रियांका,कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही"

"प्रियांका,कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही"

'संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान आहे'...

प्रियांका,कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही
X

मुंबई: मराठा आरक्षणावर राज्य आणि केंद्राच्या भूमिकेच्या मुद्यावरून राज्यातील सत्ताधारी-विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तर प्रियांका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही" असा टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

मराठा आरक्षण राज्याचा विषय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटत नसावे असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून सचिन सावंत यांनी पाटलांवर पलटवार केला आहे.

"प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही," पण संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान असल्याची" टीका सावंत यांनी केली आहे.




"महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणणं म्हणजे, मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे" असल्याचं सुद्धा सावंत म्हणाले.





Updated : 25 May 2021 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top