Top
Home > News Update > ‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल गांधी यांचा संताप

‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल गांधी यांचा संताप

‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल गांधी यांचा संताप
X

कृषी विधेयकास सुरु झालेला संसदेतील विरोध आता देशभरात रस्त्यांवरही पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आक्रमक झाले असतानाच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्राचे कृषी कायदे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावली आहे. त्याचा हा धडधडीत पूरावा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी वृत्त ट्विट केलं आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं मंजूर करताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला होता. गोंधळातच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यावर भूमिका मांडतांना राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी असं म्हटलं होतं की, विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही. मात्र, यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं राज्यसभा टिव्हीच्या चित्रफितीवरून विशेष वृत्त प्रसिद्ध केलं असून, त्यात मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

दरम्यान, संसदेत मंजूरी मिळालेल्या या तीनही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी केली असून आता त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.

Updated : 28 Sep 2020 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top