Home > News Update > 'चंद्रकांत पाटील हे भविष्यकार आहेत' ; अशोक चव्हाण यांचा टोला

'चंद्रकांत पाटील हे भविष्यकार आहेत' ; अशोक चव्हाण यांचा टोला

चंद्रकांत पाटील हे भविष्यकार आहेत ; अशोक चव्हाण यांचा टोला
X

नांदेड : मंत्री हा कधी न कधी माजी होतोच असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण टोला लगावला, सोबतच भाजप नेते चंद्रकांत पाटील हे भविष्यकार आहे असा चिमटा देखील त्यांनी काढला. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका एक दोन दिवसात बघा असं म्हटल्याचे पत्रकारांनी विचारले होते त्यावर पालकमंत्री चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुक्तिसंग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या शहिदांना पुष्प अर्पण करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्व मराठवाडा वासियांना शुभेच्छा दिल्या व गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भाव असल्याकारणाने देशावर खूप मोठे संकट आलेले आहे असे देखील ते म्हणाले. सोबतच महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी मराठवाडयाचा महत्वाचा वाटा आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होताना मराठवाड्याला नेहमीच झुकत माप मिळायला हवं आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून मराठवाड्याच्या विकासासाठी जे- जे शक्य आहे ते- ते मी करेल असं चव्हाण यांनी म्हटले आहे.

Updated : 17 Sep 2021 7:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top