मोदींच्या वाढदिवसानिमित्त इंजिनिअर खेळतायत गोट्या...
X
सोलापूर: मोदी सरकारच्या धोरणामुळे कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत. असा आरोप करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने गोट्या खेळून मोदी सरकारचा निषेध केला आहे. आज कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहे.
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते यांनी यावेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार व अनेक खोटे आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, नोटबंदी, GST ची अपयशी आणि चुकीची अंमलबजावणी, सरकारी कंपन्या आपल्या बगलबच्चा उद्योगपतींना विकण्याचे धोरणामुळे या सात वर्षात कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत, लाखो छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. या सर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे चुकीचे धोरणे कारणीभूत आहेत. आईवडील आपल्या मुलांचे चांगल्या भविष्याचे स्वप्न बघून कर्जे काढून मुलांना चांगले शिक्षण देतात या सुशिक्षित युवकांना मोदी सरकारचे मंत्री निर्लज्जपणे पकोडे विका म्हणून बेजबाबदारपणे सल्ला देतात म्हणून कोट्यवधी युवकांना बेरोजगार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी, बेरोजगार युवकांचा आवाज मोदी सरकारपर्यंत गोट्या खेळून निषेध करत असल्याचं मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी युवक बेरोजगार झाले असून त्याचा आज बेरोजगार दिवस निमित्त तसेच नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.






