News Update
Home > News Update > काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नीला स्थान

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नीला स्थान

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नीला स्थान
X

काँग्रेसची नवी कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये १८ उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. शिस्तप्रिय नेते अशी ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर अमरजीत मनहास हे काँग्रेसचे खजिनदार म्हणून काम पाहतील.

नव्या काँग्रेस कार्यकारिणीसोबतच कॉंग्रेस 14 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देखील जाहीर केले आहेत. त्यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांना सोलापूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष करण्यात आलं आहे. तर विक्रम सिंह सावंत यांना सांगली ग्रामीण चे अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

Updated : 26 Aug 2021 4:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top