Home > News Update > पगार नसल्याने कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवले जबाबदार

पगार नसल्याने कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवले जबाबदार

Conductor commits suicide due to lack of salary, blames Thackeray government

पगार नसल्याने कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवले जबाबदार
X

माझ्या आत्महत्येस मराठी माणसाचे ठाकरे सरकारच जबाबदार आहे, अशी चिठ्ठी लिहून एका कंडक्टरने आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळाचा कर्मचारी असलेले मनोज चौधरी हे जळगाव एस टी आगारात वाहक म्हणून काम करत होते. आत्महत्येपूर्वी मनोज चौधरी यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत "एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार तसेच अनियमित पगार मिळत असल्याने तसेच आत्महत्येला मराठी माणसांचे असलेलं ठाकरे सरकार जबाबदार आहे.

माझ्यानंतर PF आणि LIC चा पैसा परिवाराला मिळवून द्यावा अशी विनंतीही केली आहे" चिठ्ठीत केली आहे.

परिवारातील कर्ता तरुण गेल्याने कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. गेल्या तीन महिन्यापासून एस टी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. दिवाळी तोंडावर आहे मात्र सरकारतर्फे यावर कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहे.




Updated : 9 Nov 2020 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top