News Update
Home > News Update > महाराष्ट्रात पुन्हा हुर्रर्र.. सुप्रिम कोर्टाची बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

महाराष्ट्रात पुन्हा हुर्रर्र.. सुप्रिम कोर्टाची बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

महाराष्ट्रात पुन्हा हुर्रर्र..  सुप्रिम कोर्टाची बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी
X

ग्रामीण महाराष्ट्राचे खास आकर्षन असलेल्या बैलगाडा शर्यतीवर प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर हायकोर्टानं टाकलेली बंदी आता उठली आहे. सर्व बैलगाडा शर्यत प्रेमींना महाराष्ट्रात पुन्हा हुर्रर्र.. करता येणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर राजकीय प्रश्न ठरलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष होतं. प्रदीर्घ सुनावणी आणि वादप्रतिवादानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांना बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे. दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया शिरुरचे खासदार अमोले कोल्हे यांनी दिली आहे.

Updated : 16 Dec 2021 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top