Home > News Update > मोदींच्या सभेला आलेल्या महिला का संतापल्या?

मोदींच्या सभेला आलेल्या महिला का संतापल्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील सभेला गेलेल्या महिलांनी आपला संताप थेट माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. पत्रकार अजित अंजुम यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये या महिला महागाई, बेरोजगारी, थकीत पैसे यामुळे आपला संताप व्यक्त करत आहेत.

मोदींच्या सभेला आलेल्या महिला का संतापल्या?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील सभेला गेलेल्या महिलांनी आपला संताप थेट माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. पत्रकार अजित अंजुम यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये या महिला महागाई, बेरोजगारी, थकीत पैसे यामुळे आपला संताप व्यक्त करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघातून आलेल्या एका महिलेने आपण आता भाजपाला मत देणार नाही असे म्हटले आहे. आम्हाला वेडं समजत आहात काय, असा प्रश्नही या महिलांनी विचारला आहे. मोदींना जनतेच्या अडचणी ऐकून घ्याच्या नव्हत्या तर त्यांनी आम्हाला वाराणसीहून का बोलावले होते, असा सवालही एका महिलेने विचारला आहे. आता फक्त निवडणूक जिंकण्यासाठी गहू, तांदूळ, दिले जात आबहेत. पण ते गरिबांसाठी काहीच करत नाहीत, आम्ही यावेळी त्यांना मत देणार नाही, असेही एक महिला या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे.

हा व्हिडिओ रिट्विट करत माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी मोदींना टोला लगावला आहे. अजित अंजुम यांनी मोदींच्या सभेला आलेल्या महिलांचे चेहरे ब्लर करायला हवे होते, असे म्हटले आहे, कारण या महिलांना त्यांचा अधिकार तर मिळाला नाही पण या टीकेद्दल योगीजी त्यांच्यावर खटला नक्की दाखल करतील अशी टीका त्यांनी केली आहे.

Updated : 23 Dec 2021 3:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top