Home > News Update > कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (अण्णा) गावडे यांच्या स्मृतीदिन साजरा

कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (अण्णा) गावडे यांच्या स्मृतीदिन साजरा

कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (अण्णा) गावडे यांच्या स्मृतीदिन साजरा
X

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (अण्णा) गावडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महानगरपालिकेतील प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आणि पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शंकर गावडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (अण्णा) गावडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी केलेलं काम हे अतिशय मोलाच आहे अशी भावना यावेळी महापौर ढोरे यांनी व्यक्त केली.

Updated : 9 Aug 2021 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top