Home > News Update > राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होणार ;अनेक ठिकाणी दिवाळीनंतरच महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होणार ;अनेक ठिकाणी दिवाळीनंतरच महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होणार ;अनेक ठिकाणी दिवाळीनंतरच महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता
X

मुंबई : गेले दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. मर्यादित उपस्थिती, लसवंतांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, सध्या ऑनलाइन सत्र परीक्षा सुरू असल्याने अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांत दिवाळीनंतरच गजबज वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी ग्रामीण भागांत काही महाविद्यालये अल्प कालावधीसाठी सुरू झाली होती. परंतु, दुसऱ्या लाटेनंतर सर्वच महाविद्यालये पुन्हा बंद झाली होती. सध्या अनेक महाविद्यालयांत पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी आजपासून वर्ग सुरू करण्यास असमर्थता दाखवली आहे. केवळ विज्ञान, अभियांत्रिकी शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बोलावले जाणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षक-शिक्षके तर कर्मचाऱ्यांची माहिती महाविद्यालयांनी जमा केली आहे. मात्र, ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरू करायचे असल्याने त्याच्या तयारीसाठी महाविद्यालयांना वेळ हवा आहे. काही महाविद्यालयांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे महापालिकेने महाविद्यालयांना ही व्यवस्था पुरविण्याचे मान्य केले आहे.

Updated : 20 Oct 2021 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top