Home > News Update > दिव्यांग मतदारांच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी घेतला आढावा

दिव्यांग मतदारांच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी घेतला आढावा

दिव्यांग मतदारांच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी घेतला आढावा
X

मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाकडून सार्वजनिक लोकसभा निवडणूक-२०२४ ची घोषणा करण्यात आली असून मुंबई शहर, जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करण्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा आढावा आज घेतला.

मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-मुंबई दक्षिण मध्य' व '३१-मुंबई दक्षिण' या दोन लोकसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ९३ दिव्यांग मतदार आहेत. त्यामध्ये ३ हजार ३२ पुरुष व २ हजार ६१ महिला दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग नागरिक मतदानाच्या कर्तव्यापासून वंचित राहू नये, यासाठी मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.

सदर बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या easy move wheelchair taxi service या व्हीलचेअरची पाहाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून करण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, 'स्वीप'च्या नोडल ऑफिसर फरोग मुकादम, डॉ. सुभाष दळवी, सुनिता मते समनव्यक अधिकारी दिव्यांग मतदार, अशोका फेलोच्या चेअरमन इंद्राणी मालकानी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Updated : 23 March 2024 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top