Home > News Update > कॉकटेल पत्रकारीता धोकादायक : सरन्यायाधीश

कॉकटेल पत्रकारीता धोकादायक : सरन्यायाधीश

विचारांनी पूर्वग्रहदुषित पत्रकारीता लोकशाहीसाठी धोकादायक कॉकटेल मिश्रण आहे. पत्रकारीतेच्या उज्वल भवितव्यासाठी पत्रकारांनी वैचारीक पूर्वग्रहापासून दुर राहण्याचे आवाहन भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी केले.

कॉकटेल पत्रकारीता धोकादायक : सरन्यायाधीश
X

विचारांनी पूर्वग्रहदुषित पत्रकारीता लोकशाहीसाठी धोकादायक कॉकटेल मिश्रण आहे. पत्रकारीतेच्या उज्वल भवितव्यासाठी पत्रकारांनी वैचारीक पूर्वग्रहापासून दुर राहण्याचे आवाहन भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी केले.

आजकल की रिपोर्टिंगमध्ये बातमीपेक्षा विचार अधिक दिसतात. बातम्यांमधे पक्षपात दिसतो. मजबूत लोकशाहीसाठी पत्रकारिता आणि तथ्याआधारीत रिपोर्टींग आवश्यक आहे. बातम्यांना एक निश्चित रंग देण्यासाठी तथ्याची तडजोड करणे चुकीचे आहे. ते म्हणाले, लोकतंत्रासाठी संघर्षपूर्ण राजकारण आणि पत्रकारिता कॉकटेल योग्य नाही.

पत्रकार आणि पत्रकारीतेचे काम न्यायालयांसारखे आहे. तुम्‍ही जी विचारधारा मानत आहात आणि तुम्‍हाला तुम्‍ही मानता असा विश्‍वास आहे, तरीही तुम्‍ही काम करताना त्याचा प्रभाव पडता कामा नये. सोशल मीडियावर टिप्पणी, न्यायपालिकेवरील हल्ले रोखून पत्रकारीता आणि न्यायपालिका मध्ये विश्वास वाढला पाहीजे असं रमना म्हणाले.

पत्रकार संघटनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. पत्रकारातीता करताना नैसर्गिक न्यायाचे तत्व पाळण्याचे त्यांनी सांगितले. फोटोपत्रकार दानिश सिद्दीकी यांनी प्रेस क्लब (मुंबई प्रेस क्लब) द्वारे 2020 साठी मरणोत्तर 'जर्नलिस्ट ऑफ द इयर' (जर्नालिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे मुख्य न्यायाधीश एनवी रमणा (एनव्ही रमणा) ने डिजिटल कार्यक्रमात वार्षिक 'रेडइंक अॅवॉर्ड्स फॉर एक्सीलन्स इन जर्नलिज्म' प्रदान केले. दानिशची पत्नी फेड्रिक सिद्दीकी ने हा पुरस्कार स्विकारला. सिद्दीकीला रोहिंग्या आणि सुधारित नागरिकता कायद्याच्या विरोधातील आंदोलन, कोविड-19 आणि अफगानिस्तान गृहयुद्ध पर्यंत त्यांच्या उत्कृष्ट फोटोंसाठी सन्मानित केले गेले.

Updated : 30 Dec 2021 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top