Home > News Update > भिंवडीत झोपडीवर कोसळला कोळसा ; तीन मुलींचा मृत्यू

भिंवडीत झोपडीवर कोसळला कोळसा ; तीन मुलींचा मृत्यू

भिंवडीत झोपडीवर कोसळला कोळसा ; तीन मुलींचा मृत्यू
X

भिवंडी येथे टेंभवली भागात कोळश्याच्या ट्रक रिकामा करत असताना घरावर कोळसा पडला.त्या कोळश्याखाली घरातील सर्व सदस्य़ गाडले गेले, ट्रकचा शॉकऑप्सर तुटल्याने ही दुर्घटना घडली असल्याची माहीती मिळतेय.घ रातील इतर सदस्य वाचले, मात्र तीन मुलींना जीव गमवावा लागला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बाळाराम वळवी हे भिवंडीतील टेंभवली गावातील वीटभट्टीवर एका झोपड्यात आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा वळवी यांच्या झोपडीजवळ ट्रकमधून खाली करण्यात येत होता. यावेळी वळी यांची पत्नी जेवण करीत होती तर चार मुले झोपली होती. कोळसा खाली करत असतानाच कंटेनरचा शॉकअल तुटल्याने ट्रॉलीसहीत कोळसा झोपडीवर कोसळला. या दुर्घटनेत झोपेत असलेल्या वळवी यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या तर वळवी पती-पत्नी आणि मुलाला वाचवण्यात स्थानिक मजुरांना यश आले आहे. स्थानिकांनी त्यांना ढिगार्यातुन बाहेर काढले.यानंतर जखमी अवस्थेत मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

Updated : 27 Jan 2022 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top