Home > Max Political > परम बीर सिंह पत्र प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने नवा गोंधळ

परम बीर सिंह पत्र प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने नवा गोंधळ

परम बीर सिंह यांच्या पत्रावरून ठाकरे सरकार संकटात आलेले आहे. पण त्याचबरोबर या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्र्यांच्या स्वतंत्र निवेदनांनी सरकारमधील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

परम बीर सिंह पत्र प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने नवा गोंधळ
X

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परम बीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा कोंडीत सापडलेले आहे. पण या संकटाच्या काळातही सरकारमधील विसंवाद कायम असल्याचं पुन्हा एकदा उघड झाले आहे. परम बीर सिंह यांच्या पत्रावर रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार ज्या ईमेल आयडी वरून परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केला आहे तो खरंच त्यांचाच ईमेल आयडी आहे का, याची शहानिशा करण्यात येत आहे, असं यात म्हटलेले आहे. पण जर परमबीर सिंग यांच्या ईमेल आयडी बद्दल संशय होता तर गृह मंत्री अनिल देशमुख यांनी याआधीच निवेदन प्रसिद्ध का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे निवेदन

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

पण या निवेदनाआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो ईमेल खरा मानून निवेदन देऊन टाकल्याने सरकारमधील विसंवाद उघड झाला आहे.

Updated : 21 March 2021 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top