Home > News Update > निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला आहे. पण व्यापाऱ्यांना काही अटीदेखील सांगितल्या आहेत.

निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
X

राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. याविरोधात राज्यभरातील विविध शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्बंधांचा निषेध केला आहे. पण आता राज्य सरकारने या व्यापाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत निर्बंधांमध्ये सुधारणा करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरवन्सद्वारे संवाद साधला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी वर्गाला आवाहन केले. लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात सरकारला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंमध्ये असल्याचा सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे – संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. खरेतर, दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे, सांगत मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले. व्यापाऱ्यांच्या सूचनांचा स्वीकार केला, तर कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड-चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या येता-जातानाची काळजी घ्या. पण गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. कोरोना पूर्ण जात नाही. तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Updated : 8 April 2021 1:15 AM GMT
Next Story
Share it
Top