Home > News Update > लॉकडाऊन नाही पण पुन्हा कठोर निर्बंध, मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन

लॉकडाऊन नाही पण पुन्हा कठोर निर्बंध, मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन

लॉकडाऊन नाही पण पुन्हा कठोर निर्बंध, मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन
X

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी रात्री आणखी नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे. सोमवारपासून हे नवीन निर्बंध लागू होणार आहेत. या निर्बंधांची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे. कोरोनाशी सुरू असलेल्या लढ्याला दोन वर्षे झाली आहेत. काळजीपर्वक पावलं उचलल्याने आपण कोरोनाच्या दोन लाटांशी सामना केला. पण Omicron चा धोका जास्त आहे. नवीन व्हेरिएंट कितीत संसर्गशील आणि धोकेदायक आङे यावर चर्चा न करता आथा संसर्ग रोखण्याचे आव्हान आहे, असे ते म्हणाले. नाहीतर रुग्णसंख्या वाढली तर आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे केंद्रीय आऱोग्य यंत्रणा, टास्क फोर्स यांच्याशी चर्चेनंतर नवीन निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊन लावून राज्य ठप्प करायचे नाहीये, पण जनतेने या लढाईत साथ दिली तरच कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकांचे काम बंद करायचे नाही तर गर्दी कमी करायची आहे. लोकांची रोजी रोटी बंद करणार नाही, जनजीवन थांबू न देता नियमांचे पालन करुन कोरोनाला हरवायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

बहुतांश लोक कोरोनाच्या नियमांचे पालन करत आहेत, पण काही मोजके लोक हे नियम पाळच नाहीत, त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

10 जानेवारीपासून कोणते निर्बंध?

१. पहाटे ५ पासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही

२. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

३. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी.

४. कुणाच्याही अंत्यविधीसाठी कमाल २० लोक उपस्थित राहू शकतील.

५. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरुपाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त 50 लोक उपस्थित राहू शकतात.

६. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील, पण दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा आणि इतर सरकारी विभागांच्या नियोजित कार्यक्रमांना परवानगी असेल.

७. स्विमिंग पूल, जिम, ब्युटी पार्लर बंद राहणार.

८. सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतात. पण कोरोनाच्या नियांचे पालन बंधनकारक,

९. जिल्हास्तरावर खेळांच्या स्पर्धांवर निर्बंध, फक्त पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील, पण प्रेक्षकांना परवानगी नाही.

१०. प्राणीसंग्रहालय, किल्ले, अम्युझमेंट पार्क बंद राहतील.

११. शॉपिंग मॉल तसेच बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. तसेच उर्वरित वेळेत ५० टक्के लोकांनाच परवानगी दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.

१२. रेस्टॉरंट आणि खानावळ रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद असतील. इतरवेळी ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेशाची मुभा पण होम डिलिव्हरी सेवा सर्व दिवस सुरू ठेवता येणार

Updated : 9 Jan 2022 2:17 AM GMT
Next Story
Share it
Top