Home > News Update > तर भाजप कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्यांच्यावरती धाडी टाकेल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तर भाजप कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्यांच्यावरती धाडी टाकेल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तर भाजप कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्यांच्यावरती धाडी टाकेल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
X

कोल्हापूर (Kolhapur)विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री (uddhav thakare) उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली.यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. कुस्तीमध्ये जर भाजपा (BJP)उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल, अशा शब्दात भाजपवर टिका केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कसं सोडलं?तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडलं.तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही.या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाना साधला आहे.

सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे

राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.


Updated : 10 April 2022 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top