Home > News Update > आता पुढची पाच-दहा वर्षे अशीच पुस्तक लिहा - उद्धव ठाकरे

आता पुढची पाच-दहा वर्षे अशीच पुस्तक लिहा - उद्धव ठाकरे

आता पुढची पाच-दहा वर्षे अशीच पुस्तक लिहा - उद्धव ठाकरे
X

आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाआधीच तुम्ही अर्थ संकल्पावर पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे पुढची पाच-दहा वर्ष अशीच पुस्तके लिहीत रहा असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले.

उपमुख्यमंत्री अजित दादांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या की, तुम्ही दिल्लीत जा. पण मी आता जास्त शुभेच्छा देणार नाही. कारण आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाआधीच तुम्ही पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे पुढची पाच-दहा वर्ष अशीच पुस्तक लिहा, असे सांगत मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिले गेले असेल त्यामुळे हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढताना आपला कार्यक्रम दुसऱ्यांच्या पैशाने कसा करावा हे आज शिकल्याचे म्हटले.

माझ्यावर ही वेळ तुमच्यामुळे आलीच

दरम्यान मी आयुष्यात कधी असा विचार केला नव्हता की, मी अशा विषयावर कधी भाषण करीन. पण हा प्रसंग तुमच्यामुळे माझ्यावर आल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसेच अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. सगळ्या योजनांना अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाला अर्थ असला पाहिजे. अर्थाशिवाय संकल्प आणि संकल्पाशिवाय अर्थ असू शकत नाही. पण हा इतका मोठा देश आणि राज्य चालवत असताना नेमकं करायचं काय असा मोठा प्रश्न असतो,” असे म्हणत नोटबंदीवर देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी टीका केली.

नोटाबंदी हा विषय अर्थसंकल्पामध्ये यायला हवा होता की नको होता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आपण जो अर्थसंकल्प मांडतो, तो सगळा पैसा सर्वसामान्यांचा असतो. सर्वसामान्याला कळलं पाहिजे माझ्या पैशाचा वापर कसा करत आहात. मी कर भरतोय त्याचा माझ्यासाठी काय उपयोग केला जात आहे. काय कमी होणार, काय वाढणार आहे हे सर्वसामान्यांना कळायला हवे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. तसेच अर्थसंकल्पात छोट्या गोष्टींचा उल्लेख असावा लागतो ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

Updated : 4 March 2020 3:26 PM GMT
Next Story
Share it
Top