Home > News Update > मुख्यमंत्री घेणार बर्ड फ्लूचा आढावा

मुख्यमंत्री घेणार बर्ड फ्लूचा आढावा

गेली वर्षभर कोरोना महामारी च्या संकटाला झगडणाऱ्या प्रशासन व्यवस्थेला आता बर्ड फ्लू या संकटाचा सामना करावा लागत आहे, महाराष्ट्रात काही ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक आढळून आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आज संध्याकाळी पाच वाजता आढावा बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री घेणार बर्ड फ्लूचा आढावा
X

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे 4 दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा दोन दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनाचे संकट कायम असतानाच देशात सध्या बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी आणि कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. महाराष्ट्रातही बर्ड फ्लू या महामारीने शिरकाव केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यूपी, केरळ, राजस्थान, एमपी, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात नंतर महाराष्ट्र आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालेले आठवे राज्य ठरले आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचे संकट ओढावल्याचे स्पष्ट झाले असून या ठिकाणी तब्बल 800 कोबड्या मरण पावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता बर्ड फ्ल्यूच्या दृष्टीने आढावा बैठक घेणार आहेत.

दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पशुरोग संस्थेने दिलेल्या अहवालानुसार मुंबई, ठाणे ,परभणी, बीड ,दापोली आणि रत्नागिरी मध्ये मृत पावलेल्या पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे.

बर्ड फ्लू आढळून आलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यामध्ये बडलू ग्रस्त पोल्ट्री या याखाण्यासाठी वापरल्या जाऊ नयेत यासंबंधीचे निर्देश परभणी जिल्हा अधिकाऱ्यांना दिल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव अनुप कुमार यांनी सांगितले.

Updated : 11 Jan 2021 5:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top