आता विश्वात्मके देवे…

cmcm udhav thakcrey performs puja in Pandharpur udhav thakcrey performs puja in Pandharpur

संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ असं साकडं घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि पुजारी अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही पूजा पार पडली.

“मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता.मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे.

आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मी विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे.

मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?”
या शब्दात पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here